होळीला धर्मांधांचे गालबोट; बंगालमध्ये कट्टरपंथींचा हिंदूंवर हल्ला!

    15-Mar-2025
Total Views | 11

Attack on hindus during holi in West Bengal

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Attack on hindus during holi) होळीच्या दिवशी इस्लामिक कट्टरपंथीयांनी हिंदूंवर हल्ला केल्याची घटना पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात घडली आहे. बीरभूमच्या अनैपूर गावात शुक्रवारी (१४ मार्च) डोल पौर्णिमा आणि होळी साजरी करणाऱ्या हिंदूंवर पोलिसांसमक्ष हिंदूंवर हल्ला केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अमित मालवीय यांनी यासंदर्भात ट्विट करत हे प्रकरण उघडकीस आणले.

हे वाचलंत का? : तुषार गांधींनी संघाविरोधात ओकली गरळ

ममता बॅनर्जींच्या राजवटीत पश्चिम बंगाल हळूहळू बांगलादेशासारखे होत आहे. होळी साजरी करणाऱ्या हिंदूंवर झालेला हल्ला टीएमसीच्या पंचायत सदस्याने केल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केलाय. हिंदूंनी जय श्रीरामचा जयघोष केल्याप्रकरणी धर्मांधांनी हिंदूंना लक्ष्य केल्याचे व्हिडिओतून स्पष्टपणे दिसत आहे. हिंदूंना हिंसाचारापासून वाचवण्याऐवजी पोलिसांनी हल्लेखोरांना वाचवल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केला.



या हिंसक संघर्षानंतर, बीरभूम जिल्हा प्रशासनाने सायंथिया शहराजवळील पाच ग्रामपंचायतींमध्ये सोमवार, दि १७ मार्चपर्यंत इंटरनेट सेवांवर बंदी घातली आहे. प्रशासनाने सांगितले की, अलीकडील घटना पाहता, इंटरनेट सेवा अफवा पसरवण्यासाठी आणि बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी वापरली जाऊ शकते. त्यामुळे या सेवा सैंथिया नगर, हातोरा, मठपलसा, हरिसरा, फरियापूर आणि फुलूर ग्रामपंचायतींमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! सुनावणी १४ जुलैपासून

मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! सुनावणी १४ जुलैपासून

निवृत्त न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग' साल २०२४ मध्ये स्थापन झाला होता. या आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्र विधीमंडळाने २०२४ मध्ये 'मराठा आरक्षण कायदा २०२४' मंजूर केला होता. या कायद्यानुसार मराठा समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेला वर्गाला १० टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे. या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने समाजाला तात्पुरत्या स्वरूपात १०% आरक्षणाचा लाभ घेण्याची परवानगी देणाऱ्या आदेशाला एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात, गुरूवार दि. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121