सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता केबल-स्टे ब्रिज १००% पूर्ण! ; अंतिम टप्प्यातील कामे सुरू असल्याची एमएमआरडीएची माहिती

Total Views | 13

मुंबई :सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड प्रकल्पाच्या अखेरच्या टप्प्यातील सीएसटी रस्त्यावरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला नाला येथे उभारण्यात येणाऱ्या केबल स्टे पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त (१) विक्रम कुमार यांनी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पस्थळास भेट देऊन अंतिम तयारीचा आढावा घेतला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या या मार्गाचे बांधकाम पूर्ण केले आहे. आता अंतिम टप्प्यातील कामे सुरु आहेत. पुढच्या टप्प्यात जड वाहने किंवा विशेष वजन वापरून भार चाचणी घेत पुलाची ताकद तपासण्यात येईल. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच हा पूल जनतेसाठी खुला केला जाईल. वाकोला उड्डाणपुलावरून जाण्यासाठी आवश्यक असलेला तीक्ष्ण वक्र आणि उंची यामुळे अभियंत्यांनी पारंपारिक काँक्रीट गर्डरवर केबल-स्टेड डिझाइन निवडले. या डिझाइनमध्ये कमी खांबांची आवश्यकता असते आणि लांबीने हे पूल बांधणे सोपे आहे. केबल-स्टेड पूल २५० मीटर लांब आहे आणि तो ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (OSD) वापरून बांधण्यात आला आहे, जो काँक्रीट डेकपेक्षा हलका आणि मजबूत आहे. यामुळे खांबांवर कमी भार पडतो आणि बांधकाम जलद होते. पुलाला ९० अंशांचा वळण आहे. तो जमिनीपासून २२ मीटर वर आणि विद्यमान वाकोला उड्डाणपुलापासून ९ मीटर अंतरावर बांधला आहे. पुलाची स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत.

अंतिम टप्प्यातील कामे

- सूचना फलक बसविणे
- केबल-स्टे ब्रिजखालील तात्पुरते दिलेले आधार काढणे
- रंगकाम व अंतिम सौंदर्यीकरण
- स्ट्रीट लाईट आणि मध्यवर्ती लँडस्केपिंग

अभियांत्रिकी वैशिष्ट्ये

दक्षिण आशियातील पहिला अशा प्रकारचा केबल-स्टे ब्रिज, ज्यामध्ये १०० मीटरचे तीव्र वळण आहे. २१५ मीटर लांबीचा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक असलेला हा पूलवेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील उड्डाणपुलावरून जाणारा व जमिनीपासून २५ मीटर उंचीवर असलेला पूल आहे. दुपदरी मार्गिका असणारा हा पूल वाय आकाराचा पायलॉन उभारून मेट्रो लाइन ३ आणि इतर भूमिगत सुविधांना धक्का न लावता बांधलेला आहे. कुर्ला ते विमानतळाच्या अगदी आधी पानबाई शाळेपर्यंत थेट मार्ग असून हा पूल ईस्टर्न-वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे दरम्यान सिग्नल-विरहित आणि अखंड वाहतूक सुविधा देईल.

प्रकल्पाचे महत्त्व

- कुर्ला ते विमानतळ सिग्नल-विरहित वाहतूक
- वाकोला, बिकेसी आणि एलबीएस मार्गावरील वाहतूककोंडी कमी होणार
- प्रवासाचा वेळ व इंधन वाचणार
- एससीएलआर, इइएच आणि डब्ल्यूइएच यांमधून पूर्व-पश्चिम वाहतुकीत सुलभता
- भविष्यातील दुसऱ्या टप्प्याच्या एकत्रित जोडणीसाठी सज्ज रचना

"या आयकॉनिक ब्रिजचे काम आता अंतिम टप्प्यात असून तो नागरिकांच्या सेवेत लवकरच सुरू करण्यात येणार आहे –पावसाळ्यातच हा जनतेच्या सेवेत सुरू करण्यात येईल! हा पूल केवळ वाहतूककोंडीवरचा उपाय नसून मुंबईसाठी एक नवा लँडमार्कदेखील आहे. नाविन्य आणि परिणामकारकतेचा संगम साधणारे हे उत्तम उदाहरण आहे. मुंबईच्या 'सिमलेस कनेक्टिव्हिटी' च्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.”

- डॉ, संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121