प्रतिष्ठीत 'भानुदास एकनाथ पुरस्कार' डॉ.सदानंद मोरे यांना जाहीर!

    13-Mar-2025
Total Views | 16

sadanand more

मुंबई : संत एकनाथ महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी २०१८ पासून देण्यात येणारा ' भानुदास एकनाथ पुरस्कार' यंदाच्या वर्षी संत साहित्याचे अभ्यासक व संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांना देण्यात येणार आहे. दि. २१ मार्च रोजी पैठण इथल्या नाथमंदिर परिसरातील संत नरहरी सोनार महाराज धर्मशाळेत हा सत्कार सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पैठणकर, वारकरी व नाथभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन योगिराज महाराज गोसावी यांनी केला आहे.

संत एकनाथ महाराजांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी शांतिब्रम्ह श्री एकनाथ महाराज मिशन, पैठण ही सामाजिक संस्था २००६ पासून कार्यरत आहे. या संस्थेकडून देण्यात येणारा 'भानुदास एकनाथ पुरस्कार' या वर्षी सदानंद मोरे यांना देण्यात आला आहे. संत एकनाथ महाराज संस्थानचे संस्थापक व अधिपती नाथवंशज हभप वै. रंगनाथबुवा ऊर्फ भैय्यासाहेब महाराज पैठणकर यांच्या नावाने देण्यात येणारा दुसरा 'वारकरी भूषण पुरस्कार' हा नेकनुरच्या बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती हभप लक्ष्मण महाराज मेंगडे यांना देण्यात येणार आहे. श्री संत एकनाथ महाराज प्रबोधमार्तंड पुरस्कार हा श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध कीर्तनकार हभप संजय धोंडगे, संत एकनाथ महाराज स्वरमार्तंड पुरस्कार हा वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ उपासक आळंदी येथील हभप आबामहाराज गोडसे, संत एकनाथ महाराज तालमार्तंड पुरस्कार हा पुणे येथील मृदंगाचार्य तुकाराम भुमकर यांना तर संत एकनाथ महाराज वारकरी सेवा पुरस्कार हा पैठण येथे नाथसमाधी मंदिर परिसरात भाविकांना गेल्या अनेक वर्षांपासून विना मोबदला सायंकाळी अन्नदानाची सोय करणारे राजुसेठ लोहिया यांना प्रदान करण्यात येणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121