जुन्या गाड्यांनीही HSRP बंधनकारक, अन्यथा कारवाई होणार!

    21-Feb-2025
Total Views | 88
  
hsrp number plate mandatory for all old vehicles
 
HSRP Number Plate : १ एप्रिल २०१९ पासून तयार केलेल्या आणि खरेदी करण्यात आलेल्या वाहनांना केंद्र शासनाने एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक केली होती. त्यामुळे सर्व वाहन वितरक हे एचएसआरपी नंबर प्लेट बसवूनच वाहने ग्राहकांच्या ताब्यात देतात. मात्र आता जुन्या वाहनांनासुद्धा म्हणजेच १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांनासुद्धा 'एचएसआरपी' नंबर प्लेट बंधनकारक केली जाणार आहे. ३१ मार्च २०२५ च्या आधी एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे राज्य शासनाने बंधनकारक केलेले आहे. ज्यांच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट म्हणजेच एचएसआरपी नंबरप्लेट नसेल त्यांना ३१ मार्चनंतर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तसे पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने काढले आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना लवकरात लवकर HSRP नंबरप्लेट बसवून घ्यावी लागणार आहे. HSRP नंबर प्लेट नक्की कशी असते? ही नंबर प्लेट कशी बसवून घ्यायची, नसल्यास काय कारवाई होणार? याविषय़ी माहिती घेऊया...
 
एप्रिल २०१९ पूर्वीच्या गाड्यांना साधी नंबर प्लेट असायची, पण यामुळे गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर पोलिसांपासून पळ काढण्यासाठी वाहनांच्या नंबरप्लेट्समध्ये बदल करतात. नंबरप्लेटबदलल्यामुळे अनेकदा वाहने सापडत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारही हाती येत नाहीत. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वच नव्या वाहनांना एप्रिल २०१९ पासून 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट' लागू करण्यात आली होती. मात्र आता ही HSRP नंबरप्लेट ही सरसकट जुन्या - नव्या सगळ्याच वाहनांना बंधनकारक करण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० अन्वये शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
 
एचएसआरपी नंबर प्लेट नेमकी कशी असते?
 
सगळ्यात आधी ही HSRP नंबरप्लेट नेमकी कशी असते ते समजून घेऊयात. एचएसआरपी नंबर प्लेट्स उच्च दर्जाच्या अल्युमिनियम पासून बनवलेल्या असतात ज्यामुळे त्या अधिक टिकाऊ आणि सुरक्षित असतात. विशेष म्हणजे प्रत्येक नंबर प्लेटवर युनिक सीरियल नंबर असतो. त्यासोबत थ्रीडी होलोग्राम स्टीकर दिले जाते. ज्यामुळे ती डुप्लिकेट करणे कठीण होते. होलोग्राम स्टिकरवर अशोक स्तंभ असलेला होलोग्राम असतो जो क्रोमियमवर आधारित असून तो बनावट बनवणे अशक्य असते. या होलोग्राममध्ये वाहनाचा सर्व तपशील असतो. या नंबर प्लेटवर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग (RFID Tag) बसवलेला असतो ज्यामुळे वाहनाची ओळख रिमोटद्वारे शक्य होते. तसेच सुरक्षेसाठी या नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोडही छापला जातो. प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे. तो सहज काढता येत नाही. जो प्लेटच्या सत्यतेची पडताळणी करतो. ही प्लेट एकदा बसवल्यानंतर ती काढता येत नाही. या नंबर प्लेटला लावलेले स्क्रू काढून पुन्हा लावता येत नाहीत. त्यामुळे नंबर प्लेट बदलून दुसरी नंबर प्लेट वापरणे, यासारख्या गोष्टींना आळा बसतो.
 
त्यामुळे जर नागरिकांनी आपल्या वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट न बसविल्यास वाहनांचे मालकी हक्क हस्तांतरण, पत्ता बदल, बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्ययावत करणे आदी कामकाज थांबविण्यात येईल. एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबरप्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर भविष्यात दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. या एचएसआरपी नंबरप्लेटची किंमत किती? तर वेगवेगळ्या वाहनांनुसार यांच्या किमतीत फरक आहे. यामध्ये दुचाकी साठी ४५० रुपये +GST , तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये +GST तर चारचाकी वाहनांसाठी ७४५ रुपये +GST अश्या किमती आहेत.
 
ही नंबर प्लेट कुठे मिळेल?
 
यासाठी वाहनधारकांना transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल. यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करावी लागेल . तुमच्या जवळचे फिटमेंट सेंटर सिलेक्ट करा. आपल्याला मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरला जा. तिथे गेल्यावर वेंडर आपल्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देईल. नंबर प्लेट बसवून त्याची नोंद वेंडर वाहन प्रणालीत करेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शासनाचे अधिकृत वेंडर वगळता इतर कोणत्याही ठिकाणाहून ही नंबर प्लेट बदलून घेऊ नये. इतर ठिकाणाहून एचएसआरपी सारखी दिसणारी नंबर प्लेट बसवली तर त्या नंबर प्लेटच्या पिन नंबरची नोंद वाहन प्रणालीत होणार नाही. वाहन प्रणालीत आपली एचएसआरपी पेंडींगवर दिसेल. त्यामुळे अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवून घ्या.
 
एचएसआरपी नंबर प्लेट का महत्त्वाची आहे?
 
वाहन चोरीसारख्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी या प्लेट्स महत्त्वाच्या ठरतात. यामध्ये असणाऱ्या यूनिक नंबर आणि आरएफआयडी टॅगमुळे चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणे सोपे होते. आरएफआयडी तंत्रज्ञानाच्या वापराने वाहनाची ओळख पटवता येते तसेच वाहनाची ट्रॅकिंग करता येते. याचबरोबर बनावट नंबर प्लेट्समुळे होणारे गैरप्रकार थांबवता येऊ शकतात.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कोंकण प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत भांडुप परिमंडलाचे

कोंकण प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत भांडुप परिमंडलाचे 'कुसुम मनोहर लेले' नाटकाने पटकाविले द्वितीय स्थान!

महावितरणच्या कोंकण प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत भांडुप परिमंडलाचे ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकाने द्वितीय स्थान पटकाविले आहे. तर रत्नागिरी चे नाटक आवर्त; हे नाटक विजेते ठरले आहे. २० जून २०२५ रोजी छत्रपति संभाजी राजे नाट्यमंदिर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली. महावितरणचे संचालक (मा सं) श्री. राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते नाट्य स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ, जळगावचे मुख्य अभियंता श्री. इब्राहीम मुलाणी, महाव्यवस्थापक (मा सं) श्री. राजेंद्र पांडे, ..

गंगापूर धरणातील विसर्गात घट१ हजार ७६० क्युसेकने विसर्ग घटविला

गंगापूर धरणातील विसर्गात घट१ हजार ७६० क्युसेकने विसर्ग घटविला

मागील तीन ते चार दिवसांपासून गोदावरी नदीला आलेला पूर काही अंशी ओसरणार असून गंगापूर धरणातून सुरुअसलेला विसर्ग घटविला जाणार आहे. सध्या ६ हजार १६० क्युसेकने सुरु असलेला विसर्गमंगळवार दि. २४ जून रोजी दुपारी २ वाजता १ हजार ७६० क्युसेकने कमी करण्यात आलाअसून ४ हजार ४०० क्युसेक इतका सुरु राहील, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. मागीलसहा ते सात दिवसांपासून पाणलोट क्षेत्र, घाटमाथा आणि जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरुअसल्याने नदी-नाले दुथडी भरुन वाहायला लागले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच २४धरणांमधील जलसाठ्यात चांगलीच वाढ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121