टाटा आणि पेप्सिको यांच्यात नवीन करार! स्नॅक्स उत्पादन क्षेत्रातील मोठी बातमी

भारतातील स्नॅक्स उत्पादन क्षेत्राला नवी झळाळी मिळण्याची शक्यता

    20-Jan-2025
Total Views | 19

 

 
जाज
 
 
 
 
मुंबई : भारतीय स्नॅक्स उत्पादन क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या म्हणजे टाटा आणि पेप्सिको या दोन कंपन्यानी या पॅकेज्ड उत्पादनासाठी हा करार अस्तित्वात येणार आहे. टाटा कंपनीचे लोकप्रिय उत्पादन चिंग्स सिक्रेट आणि पेप्सिको कंपनीचे कुरकुरे या उत्पादनांसाठी हा करार असणार आहे. सध्या या क्षेत्रात अनेक छोटे – मोठे स्थानिक उत्पादने आपला जम बसवत असताना ही फार मोठी भागीदारी घडून येत आहे. २०२० मध्ये टाटा कनझ्युमर आणि पेप्सिको यांच्यातील भागिदारी संपुष्टात ोआली होेती. 
 

भारतातील स्नॅक्स खाद्यपदार्थांची उलाढाल २०२३ मध्ये ४२,६९४ कोटींवर होती, त्यात भर पडून २०३२ पर्यंत हीच बाजारपेठ ९५,५२१ कोटींवर जाण्याचे अपेक्षा आहे. या क्षेत्राचा वाढीचा वार्षिक दर हा ९.८ टक्यांवर राहणार आहे. या पदार्थांचे वाढते सेवन, अन्न आणि सुरक्षा मानकांची योग्य अंमलबजावणी यासर्व गोष्टींमुळे भारतातील ही बाजारपेठ सातत्याने वाढत आहे असे आयएमएआरसी ग्रुप या कंपनी कडून करण्यात आलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.

 

भारताच्या दृष्टीने हा एक मैलाचा दगड आहे, कुरकुरेने भारतीय ग्राहकांसाठी कायमच नवी नवी उत्पादने बाजारात आणली आहेत, आता चिंग्स सिक्रेट आणि कुरकुरे यांच्यातील या कराराने भारतीय ग्राहकांना त्यांच्या आवडीचे असे नवीन प्रॉडक्ट बघायला मिळेल अशी प्रतिक्रिया पेप्सिकोच्या मार्केटिंग संचालक आस्था भसिन यांनी दिली आहे.

 

कुरकुरे आणि चिंग्सची चायनीज चटणी ही ग्राहकांच्या कायमच पसंतीचा विषय राहिले आहेत. त्यामुळे आता हे दोन महत्वाचे मोठे ब्रॅण्ड्स एकत्र आल्यावर आता नवीन कुठला पदार्थ बाजारात येणार आहे हा भारतीय ग्राहकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणार आहे.

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121