वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली!
18-Jan-2025
Total Views | 71
बीड : (Walmik Karad) बीडमधील संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणांमधील संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. परंतु आता न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. आरोपींच्या वकीलांकडून न्यायालयाकडे तारीख वाढवून मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाकडून पुढील तारीख देण्यात आली आहे. जामीन अर्जावरील सुनावणी आता २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे.
दरम्यान वाल्मिक कराडला जामीन मंजूर करु नये, त्याला जामीन मिळाला तर तो या प्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट करु शकतो, अशी विनंती एसआयटीने न्यायालयाकडे केली होती.