"आरक्षण संपवण्याची भाषा म्हणजे..."; धनखड यांचे राहुल गांधींना खडेबोल
15-Sep-2024
Total Views |
मुंबई : आरक्षण संपवण्याची भाषा म्हणजे संविधानविरोधी मानसिकता असल्याचा दावा भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केला आहे. संविधानीक पदावरच्या माणसने अशा पद्धतीचं वक्तव्यं करणं ही अत्यंत खेदजनक बाब आहे असं म्हणत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधाला आहे. मुंबईतल्या संविधान मंदिर लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा देखील आरक्षणाला विरोध होता, आरक्षणाविरोधी पूर्वग्रहांची हीच मालिका आज आपण बघत आहोत, असं देखील ते म्हणाले. आरक्षण हे गुणवत्तेच्या विरोधात नाही. आरक्षण हा या देशाच्या संविधानाचा आत्मा आहे. आरक्षण म्हणजे एखाद्याची संधी हिरावून घेणे नाही, तर समाजाच्या ताकदीचे आधारस्तंभ असलेल्यांना हात देणे आहे, असेही धनखड यावेळी म्हणाले.
भारतीय लोकशाहीचा काळा दिवस!
२५ जून १९७५ - ज्या दिवशी भारतात आणीबाणी लागू झाली तो भारतीय लोकशाहीचा काळा दिवस होता. आणीबाणीच्या काळात हुकुमशाही प्रवृत्तीने ज्याप्रकारे दहशत निमार्ण केली होती, त्याच विसर पडता कामा नये. त्या काळात, संविधानाच्या रक्षणासाठी जी माणसं उभी राहिली, ती कधी विस्मरणात जाता कामा नये, असेदेखील उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले.