केरळ आणि आसमला महाराष्ट्राकडून प्रत्येकी १० कोटींची मदत

    06-Aug-2024
Total Views | 53

sanika
 
मुंबई : दि. ३० जुलै रोजी केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी झाली. त्यामुळे जनजीवन आणि दळणवळण देखील विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्य परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून केरळ राज्याला १० कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
 
त्याचप्रमाणे जुलै महिन्यात आसाम राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यातून सावरण्यासाठी या राज्यालाही महाराष्ट्र शासनाकडून १० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार, दि. ६ ऑगस्ट रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. उपरोक्त दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये रक्कम जमा केली जाईल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121