‘स्त्री २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! अवघ्या दोन दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये करणार एन्ट्री

    17-Aug-2024
Total Views | 34
 
stree
 
 
 
मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या महत्वपुर्ण भूमिका असणारा चित्रपट ‘स्त्री २’ प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळवत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग करत सोबत प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या खेल खेल में आणि जॉन अब्राहमच्या वेदा या चित्रपटाला मागे टाकले आहे. तसेच, लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाला आहे.
 
 
 
सॅकनिल्कच्या माहितीनुसार, स्त्री २ ने पहिल्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्टच्या रात्री झालेल्या शोमधून ८.५ कोटी, पहिल्या दिवशी ५१.८ कोटी, दुसऱ्या दिवशी ३१.४ कोटी कमवत एकूण ९१.७ कोटींची कमाई केली आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे चित्रपटाने ग्रॉस कलेक्शनमध्ये १०० कोटी पार करत ११०.०५ कोटी कमावले आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121