ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांचा 'शिवसन्मान' पुरस्कारने होणार सन्मान!

शिवराज्याभिषेक समितीकडून २८ जुलैला शिवप्रेमींचा सन्मान!

    27-Jul-2024
Total Views | 83
Appa Parab news
 
मुंबई : श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या वतीने गेल्या ३० वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या शुभ मुहूर्तावर किल्ले रायगडी लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या जल्लोषात पार पडतो. दरम्यान महाराष्ट्र शासनाने समितीच्या कार्याची दखल घेतल्याने यंदा श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती आणि महाराष्ट्र शासन यांच्या समन्वयाने हा सोहळा दि. २८ जुलै २०२४ रोजी पार पडणार आहे.

या सोहळ्यात शिवराज्याभिषेक समितीसाठी अहोरात्र झटणाऱ्या सदस्यांचा तसेच शिवप्रेमींचा सन्मान करण्यात येणार आहे. दि. २८ जुलैला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (पश्चिम) येथे समितीच्या वतीने आयोजित सकाळी ९.३० ते १२.०० या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इतिहासप्रेमी येणार आहेत. याप्रसंगी छत्रपतींच्या कालखंडावर व महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर ३५हुन अधिक पुस्तके लिहिणाऱ्या जेष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांना समितीच्या वतीने श्री शिवसन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमास शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी केले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121