डीपीडीसीच्या बैठकीसाठी शरद पवार आणि अजितदादा समोरासमोर!
20-Jul-2024
Total Views | 62
पुणे : पुण्यात शनिवारी जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, या बैठकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही समोरासमोर आले आहेत. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक सुरु आहे. या बैठकीला शरद पवार, खासदार अमोल कोल्हेदेखील उपस्थित आहेत. दरम्यान, अजित पवार या बैठकीला दाखल झाल्यानंतर शरद पवारही त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार समोरासमोर आले आहेत. या बैठकीत निधीवरून वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.