ओबीसी समाज हा देशाच्या पाठीचा कणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहाव्या महाअधिवेशनाचे उद्घाटन संपन्न

    07-Aug-2025   
Total Views |

गोवा : ओबीसी समाज हा देशाच्या पाठीचा कणा आहे. ओबीसी समाजासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गुरुवार, 7 ऑगस्ट रोजी गोवा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहाव्या महाअधिवेशनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “2005 मध्ये एका छोट्या खोलीतून ओबीसी महासंघाची सुरुवात झाली. तेव्हापासून साततत्याने गेल्या 25 वर्षांपासून माझा संबंध ओबीसी महासंघाशी आहे. जोपर्यंत ओबीसी समाजाला प्रगतीच्या मुख्य धारेत आणत नाही तोपर्यंत प्रगत भारताचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे मी ओबीसी समाजाच्या अडचणींच्या संघर्षात सामील होतो. ओबीसी समाजाच्या हिताचे 50 निर्णय घेण्याची संधी मला मिळाली. आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुरूवात आपण केली. ओबीसी समाज हा देशाच्या पाठीचा कणा आहे. या समाजाने देशाच्या जडणघडणीमध्ये पायव्याचे काम केले आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत हा विलक्षण योगायोग आहे. या ओबीसी प्रधामंत्र्यांनीच देशाला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे कार्य केले आहे. मोदीजींनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सर्वात जास्त ओबीसींना मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थान दिले. ओबीसी समाजाकरिता बोलल्यामुळे माझ्यावर टीका झाली. मला टार्गेट करण्यात आले. मला कितीही टार्गेट केले तरी मी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढत राहणार आहे. एखाद्या समाजासाठी लढणार म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात आहे, असे चित्र तयार करणे चुकीचे आहे. ओबीसी समाजासहित सगळ्या समाजांनी आम्हाला आशीर्वाद दिल्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे या प्रत्येक समाजाचे कल्याण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपले म्हणणे मान्य करत ओबीसी समाजाला त्यांचे आरक्षण परत दिले आहे. काही लोक कोर्टात केले. पण कोर्टाते ओबीसींना त्यांचे हक्काचे 27 टक्के आरक्षण दिले. ओबीसी समाजासाठी आम्ही कुठेही निधीची कमी पडू देणार नाहीत. महाराष्ट्रप्रमाणेच गोव्यात देखील ओबीसी समाजासाठी आपण चांगले निर्णय करण्याचा प्रयत्न करू,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....