नेपाळमध्ये सत्तांतर! केपी शर्मा ओली बनले चौथ्यांदा पंतप्रधान; मोदींनी दिल्या शुभेच्छा

    15-Jul-2024
Total Views | 46
 Kathmandu
 
काठमांडू : केपी शर्मा ओली यांनी सोमवार, दि. १५ जुलै २०२४ चौथ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कम्युनिस्ट पक्षाचे नेते असलेल्या केपी ओली यांनी रविवारी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांचे अभिनंदन केले आणि दोन्ही देशांमधील मैत्री आणखी दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.
 
ओली यांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले, "आम्ही दोन्ही देशांमधील मैत्रीचे नाते अधिक दृढ करण्यासाठी आणि आमच्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी आमचे परस्पर फायदेशीर सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत." मोदींनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, "नेपाळच्या पंतप्रधानपदी तुमची नियुक्ती झाल्याबद्दल केपी ओली तुमचे अभिनंदन. आपल्या दोन्ही देशांमधील मैत्रीचे सखोल नाते अधिक दृढ करण्यासाठी आणि प्रगती आणि समृद्धीसाठी आमचे परस्पर फायदेशीर सहकार्य आणखी विस्तारण्यासाठी सोबत मिळून काम करण्यास उत्सुक आहोत."
 
७२ वर्षीय ओली हे पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांची जागा घेतील. संसदेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या पाठिंब्याने ते पंतप्रधान झाले आहेत. राष्ट्रपती भवनाची मुख्य इमारत शीतल निवास येथे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी ओली यांना शपथ दिली. संवैधानिक आदेशानुसार ओली यांना त्यांची नियुक्ती झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत संसदेकडून विश्वासदर्शक ठराव मंजूर करावा लागणार आहे. २७५ जागांच्या प्रतिनिधीगृहात ओली यांना किमान १३८ मतांची गरज आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिजाबमुक्त कझाकस्तानच्या दिशेने सरकारचे मोठे पाऊल सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी

हिजाबमुक्त कझाकस्तानच्या दिशेने सरकारचे मोठे पाऊल सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी

इस्लामिक देश कझाकस्तानने सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घालत हिजामुक्त कझाकस्तान करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे येथील स्त्रीयांसाठी हा मोठा निर्णय असून त्यांना आता समाजात वावरताना मोकळा श्वास घेता येणार असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. कझाकस्तानचे पंतप्रधान कासिम जोमार्ट टोकायेव यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केलीय. खरंतर चेहरा झाकण्यावर बंदी घालणाऱ्या कायद्यात कोणत्याही एका धर्म किंवा त्याच्या पोशाखाचा उल्लेख नाही, पण इतकं मात्र स्पष्ट आहे की सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर ..

पंतप्रधान मोदींचा घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान! भारत-घाना संबंधांना नवीन गती

पंतप्रधान मोदींचा घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान! भारत-घाना संबंधांना नवीन गती

(PM Narendra Modi honoured with Ghana's National Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी २ जुलैला पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. गेल्या १० वर्षांतील त्यांचा हा सर्वात मोठा विदेश दौरा असून तो तब्बल पाच आठवडे चालणार आहे. घानापासून मोदींनी आपल्या या दौऱ्याला सुरुवात केली असून गुरुवारी त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांची भेट घेतली. राजधानी अक्रा येथे एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्राध्यक्ष महामा यांनी पंतप्रधान मोदी यांचा घानाच्या 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' या राष्ट्रीय पुरस्क..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121