मुंबई पदवीधर निकालातील मतपत्रिका छाननी प्रक्रियेत मोठी अपडेट!

    01-Jul-2024
Total Views | 227
 
Mumbai
 
मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा निकाल आज लागणार असून सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबई पदवीधर मतदारसंघातील मतपत्रिका छाननी प्रक्रियेतील एकूण आठ टप्प्यांपैकी सात टप्पे पूर्ण झाले आहेत.
 
मुंबई पदवीधर मतदारसंघात यंदा विक्रमी ५६ टक्के मतदान झाले आहे. इथे भाजपकडून 'दै. मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार आणि उबाठा गटाचे अनिल परब यांच्यात थेट लढत होती. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधरसाठी २८ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी १४ टेबलवर मतमोजणी होत आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी एकूण ४२ टेबल आहेत.
 
अशी असेल मतमोजणीची प्रक्रिया!
 
- सुरुवातीला मतपत्रिकांची छाननी केली जात आहे. पुढे वैध आणि अवैध मतांचे अलगीकरण केले जाईल.
 
- त्यातील बाद मते अलग केल्यावर वैध मतांचे पसंतीक्रमानुसार गठ्ठे केले जातील.
 
- एकूण वैध मतांची संख्या निश्चित झाल्यानंतर मतांचा कोटा निश्चित केला जाईल.
 
- जो उमेदवार निर्धारित कोट्याइतकी पहिल्या पसंतीची मते मिळवेल, त्याला विजयी घोषित केले जाईल.
 
- एकही उमेदवार मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यास दुसऱ्या फेरीतील मतांची मोजणी केली जाईल.
 
प्रमुख लढती अशा!
 
मुंबई पदवीधर - किरण शेलार (भाजप महायुती) विरुद्ध अनिल परब (महाविकास आघाडी)
 
कोकण पदवीधर - निरंजन डावखरे (भाजप महायुती) विरुद्ध रमेश कीर (महाविकास आघाडी)
 
मुंबई शिक्षक - शिवनाथ दराडे (भाजप), शिवाजी शेंडगे (शिवसेना), शिवाजी नलावडे (राष्ट्रवादी), ज. मो. अभ्यंकर (उबाठा), सुभाष मोरे (शिक्षक भारती)
 
नाशिक शिक्षक - किशोर दराडे (शिवसेना महायुती), संदीप गुळवे (महाविकास आघाडी), विवेक कोल्हे (अपक्ष)
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121