धर्मांतर करण्यास भाग पाडणाऱ्या मौलाना शाने आलमला अटक!

    03-Jun-2024
Total Views | 51
Conversion case
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात हिंदू महिलेला जबरदस्ती इस्लाम धर्म स्विकारण्यास भाग पाडणाऱ्या मौलानाला पोलीसांनी अटक केली आहे. मौलाना शाने आलम असे आरोपीचे नाव असून त्याने पीडितेवर बलात्कार करणाऱ्या तरुणासोबत पीडितेचा निकाह लावून दिला. मौलाना २० दिवसांपासून फरार होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी २५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहिर केले होते. शाने आलमला दि. २ जून रोजी अटक करण्यात आली.
 
हे प्रकरण गाझियाबादच्या अंकुर विहार पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे दि. १६ मे रोजी एका १८ वर्षीय पीडित मुलीने पोलीसात तक्रार दाखल केली. तक्रारीत पीडितेने सांगितले की, चार महिन्यांपूर्वी ती एका कारखान्यात काम करत होती. अनम नावाची आणखी एक मुलगाही याच कारखान्यात काम करत होता. त्यामुळे पीडितेची आणि त्या मुलाची ओळख झाली. ज्यानंतर अनमने पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न ही त्याने केला.
 
सुमारे दोन महिन्यांपूर्वी अमन पीडितेला अमरोहा येथे घेऊन गेला. येथे त्यांची भेट मौलाना शाने आलमशी झाली. ज्याने पीडितेला उर्दूमध्ये लिहिलेल्या तीन कागदपत्रांवर स्वाक्षरी करायला लावली. यानंतर मौलानाने पीडितेचे जबरदस्तीने इस्लामिक रितीरिवाजांनुसार निकाह लावला. मुलीचे मूळ नाव बदलून कुलसुम ठेवण्यात आले. यानंतर अमनने मुलीला अमरोहा येथील अज्ञात स्थळी २ महिने ठेवले. २ महिन्यांनंतर तो मुलीसोबत गाझियाबादच्या डीएलएफ भागात शिफ्ट झाला.
 
पीडित तरुणीही मूळ गाझियाबादच्या लोणी भागातील रहिवासी होती. दि. १४ मे रोजी ती संधी साधून मामाच्या घरातून पळून गेली. दि. १६ मे रोजी त्यांनी आरोपी अमन आणि मौलाना शाने आलम यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी या दोघांविरुद्ध आयपीसीच्या कलम ३७६ आणि उत्तर प्रदेश बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर प्रतिबंध कायद्याच्या कलम ३/५(१) अन्वये एफआयआर नोंदवला. गुन्हा नोंदवल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १७ मे रोजी पोलिसांनी अमनला गाझियाबाद येथून अटक करून तुरुंगात पाठवले.
 
अमनच्या अटकेची आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच, ३८ वर्षीय मौलाना शाने आलम फरार झाला. पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आरोपींच्या शोधासाठी छापेही टाकण्यात येत होते. त्यानंतर दि. २ जूनला पोलीसांना मौलानाचे नेमके ठिकाण सापडले. ज्यामुळे शाने आलमला पोलिसांनी पकडले.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121