मधल्या काळात लक्षद्वीपमध्ये इस्लामच्या आगमनाने अरबी भाषेचा प्रभाव वाढला. येथील धार्मिक शिक्षणातही अरबी भाषेचा वापर केला जात असे. शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आलेली महाल भाषा मालदीवमध्ये बोलली जाते. मालदीवमध्ये याला धाहेवी असेही म्हणतात. केरळमधील कम्युनिस्ट सरकारचे मंत्री व्ही शिवनकुट्टी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय घटनात्मकदृष्ट्या चुकीचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.