एसएनडीटी विद्यापीठात मियावाकी पद्धतीने १६०० वृक्षांची लागवड!

    26-Jun-2024
Total Views | 45

SNDT Miyawaki Method Tree planting


मुंबई :
मुंबई महापालिका, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) आणि एसएनडीटी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यामाने दि. २६ जून रोजी विद्यापीठाच्या जुहू कॅम्पसमधील जागेवर मियावाकी पद्धतीने २५ प्रजातींच्या १६०० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण दिनानिमित्त या वृक्षांच्या लागवडीचे काम पुर्ण झाले होते. तरी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्जवला चक्रदेव, सीएसएमआयएचे वरिष्ठ अधिकारी आणि पालिका उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाने हा प्रकल्प राबवण्यात आला.


या कार्यक्रमात पालिकेचे प्रवीण गोसावी (उप उद्यान अधिक्षक), हनुमंत गोसावी (सहाय्यक उद्यान अधिक्षक) तसेच सीएसएमआयएचे अधिकारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात वृक्षारोपण करण्यात आले. एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू कॅम्पसमधील ७०० चौ.मी जागेत १६०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ज्यात नीम, मोहगणी, फणस, बकुळ, पिंपळ, करंज,कदंब यांसारख्या २५ वृक्षांच्या प्रजातींची लागवड करण्यात आली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121