कट्टरपंथी रचतायतं ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांच्या हत्येचा कट!

न्यायाधीशांसाठी एनआयएने सुरक्षा मागितली, पीएफआय एजंटला ही अटक!

    22-Jun-2024
Total Views | 47
NIA court seeks security for Gyanvapi survey order judge

नवी दिल्ली : वाराणसी स्थित ज्ञानवापी संकुलाच्या सर्वेक्षणाचा आदेश देणाऱ्या न्यायाधीशाना धमकी येते आहे. ज्यानंतर एनआयएने त्यांच्या सुरक्षेची मागणी केली. न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी २०२२ मध्ये ज्ञानपावी संकुलाच्या सर्वेक्षणासाठी एएसआयद्वारा वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यास मंजूरी दिली होती. मुस्लिम या संकुलाला मशिद असल्याचे सांगतात. पंरतु औरंगजेबाने त्या जागेवरील मंदिर उद्धवस्त करत तिथे मशिद बांधली होती. या संकुलात त्रिशूल, कलश आणि देवी-देवातांच्या मूर्त्या ही सापडल्या आहेत.

एनआयए कोर्टाचे विशेष न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांना पत्र लिहले. त्यांनी लिहले आहे की, न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांची सुरक्षा अपुरी असून ती वाढवण्याची गरज आहे. ३ आठवड्यांपूर्वी अदनान खान नावाच्या व्यक्तीने त्यांना धमकी दिली होती, ज्यासाठी एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. इस्लामिक कट्टरपंथी त्यांची हत्या करण्याचा कट रचत असल्याचे एनआयएने म्हटले आहे. ही अत्यंत संवेदनशील बाब असल्याचे सांगून अदनान सारख्यांच्या कारवाया थांबवल्या नाहीत तर मोठा अनर्थ घडू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

रवी कुमार दिवाकर हे बरेली येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यांची सुरक्षा वाढवण्याची विनंती केली होती. १३ मे २०२२ रोजी अलाहाबाद हायकोर्टाने त्यांना सुरक्षा देण्यास सांगितले होते, परंतु आता ती अपुरी असल्याचे बोलले जात आहे. दिवाकर म्हणाले होते की, इस्लामिक कट्टरतावादी अल्पसंख्याक समाजाचे ब्रेनवॉश करून त्यांना 'काफिर' बनवण्यात गुंतले आहेत. सध्या त्यांच्याकडे ४०० पोलीस आहेत, पण दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे योग्य शस्त्रेही नाहीत.

दरम्यान उत्तर प्रदेश एटीएसने ३ जून २०२४ रोजी अदनान खानविरोधात एफआयआरही नोंदवला होता. न्यायमूर्ती रवि कुमार दिवाकर यांना धमकवण्यासाठी तो इन्स्टाग्रामचा वापर करतो. जून २०२२ मध्ये ‘इस्लामिक आगज मूव्हमेंट’कडून त्यांना धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकीसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्यात आले. एप्रिल २०२४ मध्ये, दिवाकरने बरेलीच्या एसएसपींना पत्र देखील लिहिले होते की त्यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन येत आहेत. PFI एजंटला त्याच्या लखनौ येथील निवासस्थानातूनही अटक करण्यात आली आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121