नवी दिल्ली: कर्नाटक लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी खासदार प्रज्वल रेवण्णा यास ३५ दिवसानंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली आहे.कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीला प्रज्वल रेवण्णा भारतात आल्याची माहिती इंटरपोलकडून मिळाली होती. यानंतर एसआयटी, बेंगळुरू पोलिस आणि इमिग्रेशन अधिकारी शुक्रवारी पहाटे विमानतळावर पोहोचले आणि रेवण्णा त्याला उतरताच अटक केली.
एसआयटीतर्फे आता व्हायरल व्हिडिओ संदर्भात त्याची चौकशी केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रज्वल रेवण्णाने एक व्हिडिओ जारी करून भारतात परतणार असल्याची माहिती दिली होती.दरम्यान, आरोपी प्रज्वल रेवण्णाने 27 मे रोजी एक व्हिडिओ जारी करून ३१ मे रोजी एसआयटीसमोर हजर होणार असल्याचे सांगितले होते.