मुंबई : उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी पुढे आली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली असून सुषमा अंधारे सुखरुप आहेत. महाडमध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान, हेलिकॉप्टमधील पायलटवर उपचार सुरु आहेत.
सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी शुक्रवारी हेलिकॉप्टर आले होते. मात्र, त्या यात बसण्याच्या आधीच ते महाडमध्ये कोसळले. यातील पायलटला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. काही तांत्रिक कारणामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यभरात सध्या लोकसभा निवडणूकींची रणधूमाळी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. याकरिता त्यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर शुक्रवारी कोसळले. सुदैवाने सुषमा अंधारे त्यात नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.