पंतप्रधान मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानधारणा करणार
28-May-2024
Total Views | 53
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारासाठी देशभरात दौरे केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता प्रचारसभा संपवून तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील प्रसिध्द विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ३० मे रोजी आध्यत्मिक दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले होते त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी ४८ तास ध्यानधारणा करणार आहेत.
दरम्यान, विवेकानंद रॉक मेमोरियल हे देशाच्या दक्षिणेकडील टोक असलेल्या कन्याकुमारीच्या किनाऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सायंकाळी पोहोचणार असून दि. ०१ जून रोजी दिल्लीला रवाना होऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान दि. ०१ जून रोजी होणार असून ०४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.