पवई रेसिडेंट सम्यक संघाने साजरी केली कलात्मक आंबेडकर जयंती!

    15-Apr-2024
Total Views | 290

Powai 
 
मुंबई : पवई रेसिडेंट सम्यक संघ या संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन एका समकालीन दृष्टिकोनात केले आहे. पवईतील शमाप्रसाद मुखर्जी मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या आयोजनामध्ये डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या समाजातील योगदानाबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच ही परंपरा किंवा एक नवीन चळवळ आपल्या समाजात नवीन बदल कसा आणेल याचाही प्रयत्न केला गेला.
 
आजच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही मिरवणूक, संगीत आणि नृत्य करून साजरी केली जाते. परंतु, पवई रेसिडेंट सम्यक संघाच्या नेतृत्वात एका कलात्मक पद्धतीने या जयंतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण खाकी (मुंबई पोलीस) बँडचे असल्याने सर्वाना त्यांचे कलात्मक रूप पाहण्याची संधी मिळाली.
 
मुंबई पोलीसांनी १९३६ मध्ये खाकी बँड स्थापित केला होता. या खाकी बँडने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कलेतून मानवंदना दिली. दरम्यान, हॉलीवुड आणि बॉलीवूडच्या थिम्ससह या बँडने एक वेगळंच वातावरण निर्माण केलं. याशिवाय यावेळी अनेक सदस्यांनी गाणी, नृत्य, कविता, भाषण अशा विविध माध्यमातून महामानवांचे विचार आपल्या कलेतून प्रदर्शित केले. तसेच यावेळी लेखक, वाचक आणि प्रवक्ता असलेले नवनाथ शिंदे यांनी प्रेक्षकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मार्गदर्शन केलं.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121