आपले संविधान कठोर पण लवचिक असल्याने 75 वर्ष टिकून आहे- दीपक करंजीकर

    26-Jun-2025   
Total Views | 8

कल्याण,
आपले संविधान अतिशय गतिमान आणि सक्षम असा दस्तऐवज आहे. ते कठोर पण लवचिक ही आहे म्हणूनच गेली 75 वर्ष टिकून आहे. आणि पुढील सातशे वर्ष टिकून राहील, असे मत लेखक, अभिनेते दीपक करंजीकर यांनी व्यक्त केले.

हेडविग मिडिया प्रकाशनतर्फे माधव जोशी लिखित ‘संविधान सर्वासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी करण्यात आले. यावेळी करंजीकर बोलत होते. डोंबिवलीतील फ्रेंड्स कट्टयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. यावेळी नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे,प्रकाशक चिन्मय पंडीत, लेखक माधव जोशी आणि पै फेण्डस लायब्ररीचे पुंडलिक पै आदी मान्यवर उपस्थित होते.

करंजीकर म्हणाले, या पुस्तकातून 120 पानांत संविधानाची ओळख करून दिली आहे. नवीन शिक्षण अभ्यासक्रमात हे पुस्तक समाविष्ट करून प्रत्येक शाळेत शिक्षक आणि विद्याथ्र्याना वाचायला लावले पाहिजे. कारण आपण कोण आहोत, आपले काय हक्क आहेत. आणि नागरिक म्हणून आपली काय कर्तव्य आहेत हे त्यांना कळले पाहिजे असे ही ते म्हणाले.

आणीबाणीमध्ये मिसाखाली 19 महिने कारावास भोगलेले सर्वश्री भालचंद्र लोहोकर, सतीश मराठे, प्रकाश शिर्के आणि दिवंगत आबासाहेब पटवारी यांचा सन्मान करण्यात आला. दिवगंत पटवारी यांच्यावतीने त्यांचे चिरंजीव उमेश पटवारी यांनी सन्मान स्वीकारला. यावेळी ‘आणीबीणी पुन्हा नाही, वंदे मातरम्’ अशा घोषणा देण्यात आल्या. पांढरा वेश आणि टोप्या परिधान केलेले आणि आणीबाणीचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ कार्यक र्ते हातात तिरंगा घेऊन पुस्तके प्रकाशनासाठी आले होते.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121