मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन

    14-Mar-2024
Total Views | 111

madhusudan kalelkar 
 
मुंबई : नामवंत नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य- चित्रपट निर्माते अशा बहुआयामी भूमिकेतून मनोरंजनाचा अमूल्य ठेवा रिता करीत रसिकांना अखंड रिझवणारे कै.मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी व आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी कै.मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी नाट्य मंदिर, नाट्यगृह येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन तसेच मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र अनिल कालेलकर, अलका कुबल-आठल्ये, विजय राणे, मनोहर सरवणकर या मान्यवरांच्या विशेष पुढाकाराने हा महोत्सव संपन्न होणार आहे.
 
या महोत्सवाअंतर्गत १९ मार्च ते २१मार्च अशा तीन दिवसीय विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शब्दबद्ध केलेल्या सांगीतिक गीतांच्या मैफिलीचा विशेष सोहळा ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते राजदत्त, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार २२ मार्चला सायंकाळी ७.०० वा. श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. नाटयमहोत्सव आणि सांगीतिक मैफिल सोहळा रसिकांसाठी विनामूल्य आहे. वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचे सुपुत्र अनिल कालेलकर यांनी हा महोत्सव आमच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
 
या महोत्सवात श्री. मधुसूदन कालेलकर लिखित ‘दिवा जळू दे सारी रात’(१९ मार्च), ‘डार्लिंग डार्लिंग’ (२० मार्च), ‘नाथ हा माझा’ (२१ मार्च) या नाटकाचे सादरीकरण होईल. या नाटकांच्या सादरीकरणात एक अभिनव प्रयोग करण्यात येणार आहे . ‘दिवा जळू दे सारी रात’ तसेच ‘डार्लिंग डार्लिंग’या नाटकाचे तीन अंक तीन वेगळ्या नाट्यसंस्था सादर करणार आहेत. 'डार्लिंग 'डार्लिंग’ या नाटकाचा पहिला अंक पार्थ थिएटर्स, मुंबई यांच्या विद्यमाने दिग्दर्शक मंगेश सातपुते, दुसरा अंक श्री कलाधारिणी प्रॉडक्शन्स मुंबई दिग्दर्शक गणेश पंडीत, तिसरा अंक अनामय, मुंबई दिग्दर्शक देवेंद्र पेम सादर करणार आहेत. ‘दिवा जळू दे सारी रात’ या नाटकाचा पहिला अंक अभिनय, कल्याण यांच्या वतीने दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव, दुसरा अंक व्हिजन व्हॉईस एनऍक्ट, मुंबई दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर तिसरा अंक माणूस फाऊंडेशन मुंबई दिग्दर्शक डॉ. सोमनाथ सोनवलकर सादर करणार आहेत.
 
ख्यातनाम नाटककार, गीतकार, हिंदी- मराठी चित्रपट लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचा जन्म २२ मार्च १९२४ वेंगुर्ल्यात झाला. मार्च २०२३-२०२४ हे कै.मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. आपल्या कारकिर्दीत ११० हिंदी व मराठी चित्रपटांचे लेखन मधुसूदन कालेलकरांनी केले. ७० पेक्षा जास्त चित्रपट गीते लिहिली. ३० पेक्षा जास्त नाटके लिहिली. पाच नाटकांची निर्मिती केली. अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या मधुसूदन कालेलकरांना त्यांच्या ‘हा माझा मार्ग एकला’ या सिनेमासाठी १९६१ सालचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता .
 
मधुसूदन कालेलकर यांच्या बहुविध प्रतिभेचे पैलू उलगडत त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा महोत्सव रसिकांसाठी स्मरणरंजनाचा हृद्य अनुभव असणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

दिवा-मुंब्रा घटनेबद्दल माहितीसाठी मध्य रेल्वेचे जनतेला आवाहन केले आहे. सोमवार, दि.९.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०१ वाजताच्या सुमारास झालेल्या एका दुर्दैवी घटनेत, दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करणारे सुमारे ८ जण त्यांचा तोल गेला आणि चालत्या ट्रेनमधून पडले. रेल्वे प्रशासनाने या घटनेचे कारण तपासण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. याचसोबत प्रवासी जनता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल आणि त्याच्याशी संबंधित बाबींबद्दल कोणतीही ..

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

आगामी वाहतूककोंडी मुंबई महानगर प्रदेशात विविध प्रकल्पांना गती असतानाच आता बहुप्रतीक्षित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला आता राज्य सरकारकडून गती देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २२ हजार २५० कोटी रुपये कर्जास मंजुरी दिली आहे.भूसंपादनासाठी आवश्यक कर्जासाठी राज्य सरकारने शासन हमी घेतली आहे, त्यामुळेविरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे...

मुंबई मेट्रो ९ने गाठला महत्वाचा टप्पा एमएमआरडीएने दिली माहिती

मुंबई मेट्रो ९ने गाठला महत्वाचा टप्पा एमएमआरडीएने दिली माहिती

एमएमआरडीएच्या ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा असून, सध्या या मार्गाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत, भायंदर पश्चिम येथील उड्डाण पुलाजवळील अत्यंत आव्हानात्मक आणि वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आला. हे कार्य मर्यादित रात्रीच्या वेळेत विविध यंत्रणांमधील अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले, असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली ..

शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

शाहिदी शताब्दी आणि गुरु-ता-गद्दी समागमच्या आयोजनासाठी सहकार्य करणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा ३५० वा शाहिदी आणि गुरुगोविंद सिंगजी यांचे ३५० वा गुरु-ता-गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यात नांदेड, नागपूर व मुंबई या तीन ठिकाणी करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी व गुरुगोविंद सिंगजी यांचा इतिहास निश्चितच पुढील पिढीपर्यंत पोहोचविता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121