उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार : देवेंद्र फडणवीस
03-Feb-2024
Total Views | 64
मुंबई : उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. शुक्रवारी रात्री भाजप कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला. त्यानंतर शनिवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कल्याणची घटना गंभीर आहे. कायद्यासमोर सगळे समान असून कोण कुठल्या पक्षाचा आहे, याचा विचार न करता कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी कुठली घटना घडली की, पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याबाबतचं सत्य बाहेर काढायला हवं. त्यामुळे यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याचे आदेश डीजींना दिले आहेत. यासंदर्भात अत्यंत कडक कारवाई केली जाईल," असेही ते म्हणाले.