भारतीय हिंदू अशी ओळख सांगितल्याने बांगलादेशात गेलेल्या भारतीय युवकाला बेदम मारहाण

बांगलादेशात अराजकतेचा कहर

    02-Dec-2024
Total Views | 38

Save Hindus 
 
ढाका : बांगलादेशात २३ नोव्हेंबर रोजी भारतातून एक हिंदू युवक आपल्या मित्राकडे गेला होता. त्यावेळी बांगलादेशात आपण भारतीय हिंदू असल्याची ओळख सांगितली असता त्याच्यावर हल्ला करण्यास सुरूवात केली . युवकाचे नाव सायन घोष असून तो प. बंगालची राजधानीच्या उत्तरेकडे बेलघरिया भागातील रहिवासी आहे.
 
माध्यामांशी बोलत असताना पीडित युवकाने सांगितले की, तो त्याच्या मित्राला भेटण्यासाठी बांगलादेशात गेला होता. त्यावेळी सायन घोषने त्याच्या मित्रासोबत काही दिवस वास्तव्य केले होते. एक दिवस सायन आणि त्याचा मित्र बांगलादेशात एका ठिकाणी फिरत होते. त्यावेळी त्या ठिकाणी काही लोक आले आणि त्यांनी सायन घोषची विचारपूस केली. तेव्हा सायनने मी भारतीय असल्याचे सांगितले असता, त्याला लाथाबुक्क्याने मारल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितले होते.
 
सायनसोबत त्याचा बांगलादेशी मित्रही होता, त्यावेळी त्यालाही मारहाण करण्यात आली होती. यानंतर पीडित युवकाला बांगलादेशातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यासाठी नकार देण्यात आला होता. मात्र तब्बल दोन-तीन तासांनंतर सायन घोषला ढाका वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा तोंडाला मार लागला होतो आणि कपाळावर टाके पडल्याची माहिती त्याने स्वत: दिली होती.
अग्रलेख
जरुर वाचा
मुसळधार पावसामुळे १ चौ.मी क्षेत्रफळातच खड्डे दिवस रात्र विशेष दुरूस्ती पथकाची नेमणूक

मुसळधार पावसामुळे १ चौ.मी क्षेत्रफळातच खड्डे दिवस रात्र विशेष दुरूस्ती पथकाची नेमणूक

भुयारी मार्ग पुलाची क्षती झालेली नाही : एमएसआरडीसी समृद्धी महामार्गावरून सुरक्षित वाहतूक सुरु हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील इगतपूरी ते आमणे या ७६ किलोमीटरचा चौथा टप्पा दि.५ जून रोजी वाहतुकीस खुला करण्यात आला. महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर ६७०/६८० मध्ये भुयारी मार्ग पूलावर कॉक्रीट पृष्ठभागावर २५ मी.मी.जाडीचा डांबरी चर देण्यात आलेला आहे. दि. २४ जून रोजी मुसळधार पावसामुळे ७ ठिकाणी डांबरी पृष्ठभाग निघून खड्डे पडले होते. या खड्यांचे एकूण क्षेत्रफळ साधारण १ चौ.मी. होते. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121