असा बालगंधर्व आता न होणे...

    26-Jun-2025
Total Views | 15

संगीत रंगभूमीने मराठी रसिकांना समृद्ध केले आहे. नाटककाराचं लेखन कितीही प्रभावी असलं तरी ते कथानक, त्यातील भावपूर्णता रसिकांसमोर सादर करणे हे नटाचंच काम असतं. कोणत्याही कलेचे त्या त्या समाजाशी एक जिव्हाळ्याचे नाते असते. तसेच मराठी संगीत नाटक आणि नाट्यसंगीत यांचेही महाराष्ट्राशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. महाराष्ट्राची थोर वैभवशाली परंपरा म्हणजेच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत होय. ही संगीत नाटकांची वैभवशाली परंपरा आजतागायत टिकून आहे. यातही संगीत नाटक म्हटलं की आठवतात ते बालगंधर्व म्हणजेच नारायण श्रीपाद राजहंस. आज त्यांचा जन्मदिवस. २६ जून १८८८ रोजी त्यांचा जन्म झाला.

राजहंसांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील नागठाणे हे होय. पणजोबांचे नारायण हेच नाव बालगंधर्वांना ठेवण्यात आलं. बालगंधर्वांचे वडील उत्तम सतारवादक होते. सतार शिकण्यासाठी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचा सतत राबता असायचा. तसेच ते भजन आणि उत्कृष्ट मृदुंग वादनाची साथ करीत असत. शिवाय तंबोरा दुरुस्ती करण्यात ते अत्यंत जाणकार होते. वडील पहाटेच्या प्रशांत वेळी सतारीच्या कोमल मधुर साथीसह अत्यंत भक्तीपूर्ण भावनेने भुपाळ्या, अभंग पदे इत्यादी नित्यनेमाने म्हणत असत. त्यांच्या या भावपूर्ण संगीताचा संस्कार माझ्या बालमनावर प्रातःकाळी अंथरुणावर पडल्या पडल्याच घडत गेला. परमेश्वराविषयीच्या अनन्यसाधारण भक्तीभावनेची माझ्या वडिलांची ही विशुद्ध श्रद्धाच माझ्या मनात संगीत विषयीची आवड निर्माण होण्यासाठी एका परीने कारण झाली.

वडिलांच्या भुपाळ्या ऐकू लागल्यापासून लहानपणापासूनच अभ्यासापेक्षा गातच बसावे असे सारखे मला वाटत असे. आई पण अभंग व देवाधिकांची पदे फारच गोड सुरात म्हणत असे. माझी धाकटी आत्या हरीआत्या हीसुद्धा गोड आवाजात गात असे. या सर्व संगीत वातावरणाचा परिणाम माझ्या मनावर अगदी जन्मापासूनच घडत गेला व म्हणूनच माझ्यात गायनाची आवड सारखी वाढतच जाण्यात या परिस्थितीचा संस्कार माझ्या मनावर झाला हेच मला एका दृष्टीने फार दैवयोगासारखे वाटते. असे बालगंधर्व म्हणत.

कशी या त्यजू पदाला, ललना मना, प्रभुजी गमला अशा एकापेक्षा एक सरस अविट गोडीच्या नाट्यपदांनी सजलेलं, गाजलेलं, बालगंधर्वांसारख्या दिग्गज नटसम्राटांनी स्वराभिनयाने गाजविलेलं संगीत नाटक म्हणजे एकच प्याला. संगीत नाटकांच्या सुवर्णकाळात लोकप्रिय ठरलेली ही अजरामर कलाकृती यातील बालगंधर्वांची "एकच प्याला"मधील अविस्मरणीय सिंधू आज १०० वर्षे लोटली तरी मायबाप रसिक प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहे. "सौभद्र"मधील सुभद्रा असो की "मानापमान"मधील भामिनी असो अशा २७ नाटकात स्त्री भूमिका करून बालगंधर्वांनी संगीत रंगभूमीची सेवा केली. विधीलिखित नाटकानंतर बालगंधर्वांनी कान्होपात्रा नाटक केल. त्यात त्यांनी कान्होपात्राची भूमिका केली १९ नोव्हेंबर १९३१ रोजी या नाटकाचा प्रयोग मुंबईत झाला बालगंधर्वांनी केलेलं भक्तीरस विषयक असं हे पहिलंच नाटक. यातली पद गाजली. अवघाची संसार सुखाचा करीन, पतीत तू पावना म्हणविसी नारायणा ही अभंग सदृश्यपद अतिशय लोकप्रिय ठरली. पुढील काळात बालगंधर्वांनी भजनांवर जी अमाप लोकप्रियता मिळवली त्याचा पाया या कान्होपात्रा नाटकाने घातला. त्यांच्या मुद्रेत, नजरेत, हसण्यात, लाजण्यात, चालण्यात, बोलण्यात, नेसण्यात, साक्षात स्त्रीचा संचार झालेला होता. नंतरच्या काळात त्यांनी पुरुष भूमिका ही साकारल्यात. संगीत रंगभूमीला पडलेले एक सुरेल स्वप्न असलेले बालगंधर्व यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन...

लेखिका - विशाखा देशमुख (साहित्य विभाग संयोजिका संस्कार भारती जळगाव)
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121