शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे

टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार वाढीचे आश्वासन

    18-Dec-2024
Total Views | 41

tmt
 
 ठाणे : (Thane) वाढीव वेतन मिळावे यासाठी ठाणे परिवहनच्या (TMT) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक काम बंद आंदोलन पुकारल्याने प्रवाश्यांचे अतोनात हाल झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या शिलेदारांनी मध्यस्थी केल्यानंतर रात्री उशिरा कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतले. टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे आश्वासन यावेळी बैठकीत देण्यात आले आहे.
 
ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडे जेएनएनयूआरएम अंतर्गत प्राप्त झालेल्या १९० बसेस तसेच महिलांकरीता असलेल्या ५० तेजस्विनी बसेसचे परिचलन व परिरक्षण करण्याचा ठेका मे. सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स प्रा.लि. यांना देण्यात आला असून त्याअनुषंगाने सदर वसेस सदर ठेकेदाराने नेमलेल्या कंत्राटी चालक मार्फत चालविण्यात येत आहेत. टीएमटीच्या या कंत्राटी कमर्चाऱ्यांनी मंगळवारी सकाळी अघोषित संप पुकारला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असल्याचे दिसून आले. या आंदोलनाची दखल घेत शिवसेना शहरप्रमुख तथा माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, तसेच माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी मे. सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स प्रा.लि. या ठेकेदारांच्या प्रतिनिधी, कंत्राटी चालकांचे प्रतिनिधी आणि परिवहन सेवेकडील अधिकारी यांचेसमवेत प्रदिर्घ चर्चा करुन तोडगा काढण्यात आला.
 
ठेकेदाराने परिवहन व्यवस्थापन आणि कमर्चाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेत भरघोस पगार वाढ देण्यास सहमती दर्शविली आहे. कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असून येत्या काळात पगारवाढ देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्यानंतर राम रेपाळे आणि सिद्धार्थ ओवळेकर यांच्या विनंतीस मान देऊन कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलन मागे घेतले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचे विमान गुरुवारी दि. १२ जून दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वसतीगृहातील राहणाऱ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, गुजरातचे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121