दादर पारशी कॉलनीतील नागरिकांनी घेतली अतिरिक्त आयुक्तांची भेट

    11-Dec-2024
Total Views | 51
Parasi

मुंबई : प्रभाग क्रमांक १७८ चे माजी नगरसेवक अमेय घोले यांच्या नेतृत्वाखाली दादर ( Dadar ) पारशी कॉलनीतील नागरिकांनी मंगळवार, दि. ११ डिसेंबर रोजी मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अभिजित बांगर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबचत झालेल्या बैठकीत कॉलनीत सुरू असलेल्या रस्ते बांधकामाच्या सध्याच्या स्थितीबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीविषयी माहिती देताना माजी नगरसेवक अमेय घोले म्हणाले, अतिरिक्त आयुक्तांसमोर आम्ही काही महत्त्वाचे मुद्दे आणि सूचना मांडल्या. रस्ते बांधकामाच्या वेळी ठरलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून त्रास कमी होईल. उत्खननाच्या वेळी वृद्ध नागरिक आणि लहान मुलांसाठी सुरक्षित व सोयीचा मार्ग उपलब्ध करून द्यावा. स्टॅम्प कॉंक्रिटच्या ऐवजी पूर्वीप्रमाणे ब्रूमिंग तंत्राचा वापर करावा, जे अधिक टिकाऊ आणि योग्य ठरेल, अशी विनंती त्यांना केल्याचे घोले यांनी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121