मॉर्निंग वॉकदरम्यान संजय केळकर यांनी साधला ठाणेकरांशी संवाद

    09-Nov-2024
Total Views | 22
Sanjay Kelkar

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांच्या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिदास मिळत असून शुक्रवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांनी ब्रह्माळा तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करत नागरिकांच्या भेटी घेतल्या. या भेटीत नागरिकांनी ‘आपल्या हक्काचा माणूस म्हणजेच संजय केळकर’ अशा भावना व्यक्त करत ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने करीत आहेत. घरोघरी जाऊन महायुती सरकारने केलेल्या कामांची माहिती देऊन केळकर यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. केळकर हे सुद्धा शहराच्या विविध भागात प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केळकर यांची भेट घेऊन त्यांनाच पाठिंबा असल्याचे नागरिक तसेच विविध समाज संघटना जाहीर करीत आहेत. शुक्रवारी दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी आ. संजय केळकर यांनी ब्रह्माळा तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करत नागरिकांची भेट घेतली.

ब्रह्माळा तलाव परिसरात सकाळच्या वेळेत नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण असा सर्वांचा समावेश असतो. या सर्व नागरिकांची केळकर यांनी भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, निवडणुक प्रमुख सुभाष काळे, भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील, संतोष साळुखे, शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, शहर प्रमुख हेमंत पवार आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी ‘आपल्या हक्काचा माणूस म्हणजे संजय केळकर’ अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121