भाजपचे नरेंद्र मेहता ६० हजाराच्या मताधिक्याने विजयी
23-Nov-2024
Total Views |
ठाणे / मीराभाईंदर : निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसाच्या काही तास आधी भाजपाने उमेदवारी जाहीर करून निवडणूकीच्या मैदानात उतरवलेल्या नरेंद्र मेहता ( Narendra Mehta ) यांनी पक्षाचा विश्वास सार्थ करून दाखवला. मेहता यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मुजफ्फर हुसैन यांचा ६० हजार ४३३ च्या मताधिक्याने पराभव मीरा भाईंदरमध्ये भाजपाचा झेंडा रोवला. भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जय श्रीराम च्या घोषणा देत जल्लोष केला.
उमेदवारी मिळाल्यापासुन प्रचाराचा वेग वाढवत नरेंद्र मेहता यांनी झंझावात सुरू केला होता. उत्तर प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच देशभरातील अनेक मान्यवर नेते यांनी मीरा-भाईंदर शहरात जाहीर सभा घेतल्या होत्या. प्रचारात आघाडी घेतल्यानंतर त्यानी मतांची आघाडी सुध्दा घेतली होती. मतमोजणीमध्ये सुरूवाती पासूनच आघाडी घेत व ती कायम ठेवत अखेरच्या २५ व्या फेरीत त्यांनी १ लाख ४४ हजार ३७६ मते मिळवून महाविकास आघाडीचे उमेदवार मुजफ्फर हुसैन यांचा ६० हजार ४३३ मतांनी पराभव करून विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या माजी आमदार गीता जैन यांना २३ हजार ०५१ मतांवर समाधान मानावे लागले.