ठाणे, दि.९ : मुंबईजवळील कसाऱ्याजवळ एक्सप्रेसला आग लागल्याची घटना घडली आहे. रेल्वे रुळाच्या बाजूलाच गवताला आग लागल्याने नंदीग्राम एक्स्प्रेसला याचा फटका बसला आहे. एक्स्प्रेसला आग लागल्यानंतर प्रवासी जीव मुठीत घेऊन खाली उतरले. अनेक प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या.
शनिवार, दि.९ रोजी नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कोचला आग लागल्याची घटना घडली आहे. कसारा परिसरात नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कोचला आग लागली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. आगीची घटना लक्षात आल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आग लागल्याचं लक्षात येताच नंदीग्राम एक्स्प्रेस कसारा सिग्नल जवळ थांबवण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार, नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कॉम्प्रेसरला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याचं लक्षात येताच ट्रेन कसारा सिग्नल जवळ थांबवण्यात आली. आगीच्या घटनेमुळे प्रवाशांची एकच धावपळ उडाली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र एक्स्प्रेसचे नुकसान झाले आहे. नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कॉम्प्रेसरला आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच याबाबत तातडीने अग्निशमन दलाला कळवण्यात आले, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ट्रेनमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले असून, त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.