पुणे: बुधवारी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी जोरदार हजेरी लावली. तर चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. सकाळ पासून पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. हवामान विभागाने मुंबई आणि मुंबई उपनगराला अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तंविली आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील पुढील आठठेचाळीस तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आल आहे.
धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे जिल्ह्यातील १४ धरणे साठ टक्के हुन अधिक भरली आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासह पानशेत आणि वरसगाव ही तीनही धरणे सत्तर टक्के हुन अधिक भरल्यामुळे खडकवासला धरणातून दुपार नंतर सुमारे दोन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात आला. जिल्ह्यातील प्रमुख १४ धरणे साथ टक्के पेक्षा जास्त भरली आहेत. खडकवासला, वरसगाव, पानशेत ७० टक्के पेक्षा जास्त भरली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ह्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी पाणी सोडले जाणार आहे.
विसर्ग असल्याने नदीपात्रात सावधानतेची सूचना देण्यात आली आहे. यावेळी खबरदारी म्हणून पुण्यातील भिडे पूल सकाळीच बंद करण्यात आला होता. तसेच नदी काठच्या गावांना आणि परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात झाड पडून मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पानशेत, वरसगाव धारण आणि खडकवासला हे पुण्याला पाणी पुरवठा करणारी मुख्य धरण आहेत. पानशेत , वरसगाव धरण ठराविक पातळी पेक्षा जास्त भरले की त्यातून विसर्ग केला जातो. परंतु यामुळे खडकवासला धरणावर अतिरिक्त भार येऊ शकतो. अजून जून महिन्याचे बारा दिवस बाकी आहेत. पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग सुरु केला आहे. पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु होणार आहे. त्यामुळे नदी पात्रात आणि नदी काठाच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.