‘सावरकर आणि गांधी’ विषयावर अक्षय जोग यांचे व्याख्यान
08-Nov-2024
Total Views | 24
मुंबई : ‘सावरकर विचार मंच’, नवी मुंबईच्यावतीने रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. प्रसिद्ध लेखक, स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक, संशोधक अक्षय जोग ( Akshay Jog ) यांचे ‘सावरकर आणि गांधी’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यासोबतच ‘सावरकर-आक्षेप आणि वास्तव’ या विषयावर मुक्त चर्चासत्रदेखील होणार आहे. हा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिभवन, स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय इमारत, पहिला माळा, सेक्टर-३, वाशी, नवी मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न होईल.
सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे, निर्वाह भत्ता, सैनिकीकरण, द्विराष्ट्रवाद, गांधीहत्या अशा विषयांवरील आक्षेपांचे ससंदर्भ वास्तव जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ९९३०४१०००१, ९५९४९६१८५६, ९८२०५७०२९४ या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.