एनसीपीए मध्ये प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सवाचे आयोजन

    15-May-2025
Total Views |
 
 NCPA Marathi Theatre Festival
 
मुंबई: ( NCPA Marathi Theatre Festival ) सालाबादप्रमाणे यंदाही एनसीपीएचा 'प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव' एक्सपेरिमेंटल थिएटर, टाटा थिएटर, जेबीटी संग्रहालय एनसीपीए येथे, गुरुवार, २२ मे ते रविवार, २५ मे महिन्यात होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतला हा उपक्रम म्हणजे कलाकार आणि रसिकांना एकत्र येण्याची पर्वणीच. या चार दिवसांच्या सोहळ्यात उत्तमोत्तम नाटके, वाचन-उपक्रम आणि रंगमंचासंबंधित विविध कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत,ज्यात मराठी रंगभूमीशी संबंधित अशा जाणकारांशी सुसंवाद साधण्याची संधी आपल्याला मिळेल.
 
या उत्सवात आज लोकप्रिय असलेली व्यावसायिक नाटके तसेच अनेक तरुण कलावंतांच्या प्रयोगशील कलाकृती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपल्या प्रोत्साहनामुळे लोकप्रिय कलावंताना वाहव्वा मिळेल पण उद्याच्या रंगभूमीसाठी नवीन काही करू पाहणाऱ्या उदयोन्मुख कलाकार व रंगसंस्थांना प्रोत्साहन देण्याचे काम आपण नाट्यरसिक म्हणून जरूर कराल. आमच्या या 'प्रतिबिंब' नाट्य उत्सवाला नावाप्रमाणे, महाराष्ट्राच्या समृद्ध रंगभूमी परंपरेचा आरसा लाभलेला आहे. हाच वारसा पुढे नेणारी तरुण कलावंत पिढी आपल्यासमोर नवनवीन विषय मांडणार आहेत.ज्यातून आपल्याला एकूण जगण्यासंदर्भातील नवे भान व नवा दृष्टिकोन पाहायला मिळू शकेल. रसिक प्रेक्षक या नात्याने आपण या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेल्या नाट्य उत्सवांत सहभागी होऊन नाट्यकलेला उत्स्फूर्त दाद द्यावी.
 
महोत्सवाच्या संचालिका, राजेश्री शिंदे यांनी सांगितले की, “प्रतिबिंब हा एक मराठी सांस्कृतिक उत्सव आहे जो कलाकारांना, थिएटर ग्रुप्सना, कार्यशाळा संचालकांना आणि प्रेक्षकांना एकत्र आणतो. यंदाचा प्रतिबंब नाट्य उत्सव या दृष्टीने घेतला गेलेला महत्वाकांक्षी प्रयत्न आहे,विविध विषयांवर भाष्य करणारी नाटकं, कार्यशाळा आणि इंस्टॉलेशन्स या उत्सवाचा भाग आहेत .या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट अधिकाधिक थिएटर ग्रूपसना या नाट्य उत्सवात सामील करून विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या ,त्यांनी सादर केलेल्या कलाकृती जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात. आम्हाला खात्री वाटते की ‘प्रतिबिंब’ हा राज्यातील सर्वोत्तम प्रादेशिक रंगभूमीचा अनुभव घेण्यासाठीचा वन-स्टॉप प्लॅटफॉर्म बनेल.
 
‘प्रतिबिंब’ नाट्य उत्सव हा मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा जो आपल्या विविध शैलींतील विस्तृत सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे तो एनसीपीए च्या या मंचावर साकारणार आहे. तेव्हा या आणि एनसीपीएच्या मंचावर सादर होणाऱ्या कथांद्वारे महाराष्ट्राच्या नाट्यमय आणि सांस्कृतिक कलाविश्वाचा अनुभव घ्या”.
 

 NCPA Marathi Theatre Festival