राज्याभिषेक समारोह संस्थेच्या दुर्ग बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न
22-Nov-2024
Total Views | 27
1
ठाणे : राज्याभिषेक समारोह संस्था आयोजित दुर्ग बांधणी ( Durga Bandhani ) स्पर्धा २०२४ चा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच सहयोग मंदिरातील दोन सभागृहात पार पडला. ठाण्यातील १२ आणि महाराष्ट्रातील १२ अशा २४ विजेत्यांना मानपत्र सन्मानचिन्ह आणि राज्याभिषेक दिन महत्व पुस्तक देऊन प्रत्येकाचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी देश - विदेशातुन तब्बल २०५ जणांनी नोंदणी केली होती. स्पर्धेचे हे १३ वे वर्ष होते.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी व त्यांच्या दुर्गांचे महत्व जाणुन घेण्यासाठी राज्याभिषेक समारोह संस्था, ठाणे यांच्यातर्फे दिवाळी निमित्त दुर्ग बांधणी स्पर्धा - २०२४ आयोजित करण्यात आली होती. यावर्षी पोलंड ऑस्ट्रेलिया मस्कत अशा प्रदेशातून सुद्धा नोंदणी प्राप्त झाल्या होत्या. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच सहयोग मंदिर सभागृहात पार पडला. यावेळी तब्बल ७५० जणांची उपस्थिती लाभल्याने सोहळा दोन सभागृहात आयोजित केला होता. ठाणे विभागातील बारा व महाराष्ट्र विभागातील बारा अशा २४ जणांना प्रथम, द्वितीय, तृतीय, विशेष उल्लेखनीय, उत्कृष्ट सादरीकरण व उत्तेजनार्थ अशा पारितोषकांचे वितरण करण्यात आले. सर्व विजेत्यांना मानपत्र सन्मानचिन्ह आणि राज्याभिषेक दिन महत्व पुस्तक देऊन प्रत्येकाचा गौरव करण्यात आला.सुप्रसिद्ध कीर्तनकार रोहिणीताई परांजपे यांनी शिवचरित्र आणि शिवराज्याभिषेक महत्व या विषयावर उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन करून भारावून सोडले. शिवराज्याभिषेक प्रसंग वर्णन करताना दोन्ही सभागृहातील प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले होते.