दिल्ली विधानसभा निवडणूक : ‘आप’ची पहिली उमेदवार यादी जाहीर
22-Nov-2024
Total Views | 52
1
नवी दिल्ली : पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. गुरुवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी आम आदमी पक्षाने ( AAP ) आपली पहिली ११ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजप आणि काँग्रेसमधून ‘आप’मध्ये आलेल्या सहाजणांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपमधून आपमध्ये आलेल्या बी. बी. त्यागी, अनिल झा आणि ब्रह्मसिंह तंवर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते की, “निवडणुकीसाठी तिकीटवाटपाचे काम केवळ जनमत आणि संभाव्य उमेदवारांच्या विजयाच्या शक्यतांच्या आधारे केले जाईल. विजयी उमेदवारांनाच तिकीट दिले जाईल, असे पक्षाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘आप’ने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे,” असे त्यांनी सांगितले.