मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय राजन शिरोडकर ( Rajan Shirodkar ) यांचे मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते राजकारणापासून दूर होते.
शिवसेनेतील जुन्या फळीतील नेते म्हणून शिरोडकर यांची ओळख होती. १९९५ साली युती सरकारच्या कार्यकाळात ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष होते. राजन शिरोडकर यांनी मनसेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका निभावली होती. मात्र, काही कारणांनी त्यांनी तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांचे चिरंजीव आदित्य शिरोडकर हे सध्या उबाठा गटाच्या पुणे सह संपर्कप्रमुख पदावर कार्यरत आहेत.