नाशिक : ( Harshutai Thakur ) “माझा एक हात काम करत नाही. परंतु, त्याची तमा न बाळगता मी मैदानात उतरले आहे. घरात बसले नाही. देवी-देवतांची खिल्ली उडवणे, टीका करणे आता कुठेतरी थांबले पाहिजे. माझा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. परंतु, धर्म-संस्कृती काय असते हे शिकवणे माझ काम आहे. जिहाद्यांना प्रत्युत्तर देणे माझे काम आहे. जो माझ्या देवी-देवतांच्या विरोधात बोलणार, त्याला आम्ही सोडणार नाही,” असा इशारा हिंदू रणरागिणी हर्षुताई ठाकुर यांनी दिला.
श्रीइच्छापूर्ती गणेश मंदिर, कमोद नगर गार्डन, इंदिरानगर, नाशिक याठिकाणी नुकत्याच आयोजित ‘हिंदू स्वाभिमान सभे’त त्या बोलत होत्या. ‘श्रीइच्छापूर्ती गणेश मित्र मंडळ’ (कमोद नगर), ‘हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान’, ‘हिंदू जनसंपर्क कार्यालय’ आणि ‘शिवाज्ञा प्रतिष्ठान’ रणवाद्य ढोलपथक यांच्यावतीने जातीजातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्रित करण्यासाठी या ‘हिंदू स्वाभिमान’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मोठ्या संख्येने हिंदू बंधू-भगिनी उपस्थित होते.
अब काशी, मथुरा बाकी है...
प्रभु रामचंद्रांची शपथ घेतली होती आणि खरोखरच मंदिरही त्याचठिकाणी आणि तेही भव्य बनवलेच. अयोध्या तो सिर्फ झाँकी है, काशी, मथुरा बाकी है. आपल्याला ‘लॅण्ड जिहाद’ हा प्रकार माहिती करून घेतला पाहिजे. आपल्याला वाटते आपण फक्त सोसायटीपुरते मर्यादित आहोत, परंतु, आपल्या सोसायटीच्याबाहेर काय षड्यंत्र चालले आहे, हे कुणालाही माहित नसते, अशी खंतही यावेळी हर्षुताई ठाकुर यांनी व्यक्त केली.