अहमदाबाद येथून ५० बांगलादेशी घुसखोरांना घेतलं ताब्यात

    25-Oct-2024
Total Views | 39

Bangladeshi in Gujarat

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladeshi in Gujarat) 
देशाच्या विविध भागातून बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांच्या अटक होण्याच्या बातम्या समोर येत आहेत. गुजरातच्या अहमदाबाद येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ५० बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती उघड झाली आहे. याशिवाय गुजरातची गुन्हे शाखासुद्धा घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी सध्या शेकडो लोकांची चौकशी करत आहे. यापूर्वी पुणे आणि त्रिपुरातूनही अवैध बांगलादेशी पकडले गेले होते.
गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर सातत्याने कारवाई करत आहेत. यासोबतच २०० हून अधिक लोकांची चौकशी सुद्धा होत आहे. अहवालानुसार, हे सर्वजण बनावट आधार कार्ड बनवणे, वेश्याव्यवसाय आणि इतर अनेक बेकायदेशीर कामांमध्ये गुंतले होते. महाराष्ट्राच्या पुणे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे २१ ऑक्टोबर रोजी राजनगाव येथे शोध मोहीम राबवून २१ बांगलादेशींना अटक केली होती.

हे लोक एकतर पायी सीमा ओलांडून पश्चिम बंगालमध्ये आले किंवा बोटीतून बेकायदेशीरपणे येथे पोहोचले. भारतात प्रवेश केल्यावर ते पुढे गुजरात आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. प्राथमिक तपासातून हे बांगलादेशी ६ महिने ते १० वर्षे देशात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड आणि आधार कार्ड यांसारखी कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय तेथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांची माहितीही अनेकांकडून मिळाली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
‘लाडकी बहीण’ योजना आता सिनेमाच्या रूपात; अण्णा नाईक व गौतमी पाटील झळकणार प्रमुख भूमिकांमध्ये!

‘लाडकी बहीण’ योजना आता सिनेमाच्या रूपात; अण्णा नाईक व गौतमी पाटील झळकणार प्रमुख भूमिकांमध्ये!

महाराष्ट्र सरकारच्या जनहितकारी योजनांपैकी विशेष चर्चेत आलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लाडकी बहीण’ या शीर्षकाने मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या विषयावर आधारित हा पहिलाच सिनेमा असल्याने सर्वसामान्यांमध्ये याविषयी उत्सुकता वाढली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व संकल्पना गणेश शिंदे यांनी मांडली असून, निर्मितीची धुरा शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे या निर्मात्यांनी ओम साई ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121