कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपूरात इमर्जन्सी लँडिंग! नेमकं कारण काय?

    17-Jun-2025
Total Views | 23



नागपूर : एकीकडे अहमदाबाद विमान दुर्घटनेने सगळीकडे खळबळ उडाली असताना आता नागपूरमध्ये एका विमानाचे आपत्कालिन लँडिंग करण्यात आले आहे. मंगळवार, १७ जून रोजी कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे नागपूरात आपत्कालिन लँडिंग करण्यात आले आहे.

कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचे आपत्कालिन लँडिंग करण्यात आले असून सगळ्या प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले आहे. उड्डाणादरम्यान मिळालेल्या धमकीमुळे ताबडतोब विमान नागपूरला वळवण्यात आले.


तसेच या धमकीबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. दरम्यान, बॉम्बशोधक पथक नागपूर विमानतळावर दाखल झाले आहे. विमानात खरंच बॉम्ब ठेवला आहे का? की, कुणीतरी अफवा पसरवली याबाबतचा तपास सुरु आहे. पोलिस आणि विमानतळ सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून आतापर्यंत अशी कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे, नुकतेच मंगळवारी पहाटे सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI180 मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने उड्डाणाला विलंब झाला. अहमदाबाद येथील दुर्घटनेत तब्बल २७४ लोकांचा मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. त्यामुळे आता विमान प्रवासावर सर्वांचे बारकाईने लक्ष आहे.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121