महावितरणमधील एकूण ५३४७ जागांसाठी भरती; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता, पद आणि पगार

    02-Jan-2024
Total Views | 34
Mahavitaran Recruitment 2024

मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्या राज्य विद्युत वितरण कंपनीकडून लवकरच रिक्त पदांकरिता भरती केली जाणार आहे. महावितरणकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच राज्यातील तरुणांना शासकीय नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अर्जप्रक्रिया जानेवारीत असणार आहे. अर्जदारास ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचा आहे. महावितरण अंतर्गत होणाऱ्या भरतीकरिता काय पात्रता असणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.

पदाचे नाव -

विद्युत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता -

१० वी उत्तीर्ण ते पदवीधर

अर्ज शुल्क -

खुल्या प्रवर्गासाठी २५० रुपये अधिक जीएसटी
मागास प्रवर्गांसाठी १२५ रुपये अधिक जीएसटी

वयोमर्यादा -

१८ ते २७ वर्षांपर्यंत

वेतनमान -

१५ ते १७ हजार रुपये

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121