जरांगेंच्या मुंबई दौऱ्याची तारीख ठरली! आझाद मैदानात उपोषण करणार

छत्रपती शिवाजी महाराज पार्कचीही जागा मागितली

    15-Jan-2024
Total Views | 45
Manoj Jarange Patil on Maratha Reservation

मुंबई :
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी येत्या दि. २६ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू होणार आहे. दरम्यान, आपला मोर्चा आता मुंबईच्या दिशेने वळवायला सुरूवात केली आहे. राज्य सरकारला मराठा आरक्षणाप्रश्नी ठोस भूमिका घेण्यासाठी मराठा आंदोलक मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क व आझाद मैदानाची मागणी करण्यात येत आहे.
 
मुंबईत आमरण उपोषण करण्यासाठी मराठा समाजाकडून जोरदार तयारी करण्यात येत असून मनोज जरांगेंनी समस्त मराठा समाजाला हजर राहण्यासाठी आवाहनदेखील केले आहे. तसेच, २५ जानेवारीला पनवेलमध्ये मोर्चा धडकणार आहे. त्यानंतर मराठा समाज मुंबईत आमरण उपोषण सुरू करणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण तापले असताना ओबीसींकडून याला विरोध करण्यात आला आहे.
 
जरांगेंच्या सरसकट आरक्षणाच्या मागणीला ओबीसीकडून विरोध करण्यात आला असून राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ठिकठिकाणी जाहीर सभादेखील घेतल्या होत्या. भुजबळांनी मराठा आरक्षण हे ओबीसी कोट्यातून नको अशी भूमिका मांडत मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली. तसेच, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीदेखील ओबीसी समाजाला मुंबई येण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्नशील असून निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमत यासंदर्भात कार्यवाही करत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121