पंतप्रधान मोदींचे अरुण गोविल यांनी मानले आभार, अयोध्येला जाण्याची केली जय्यत तयारी

    13-Jan-2024
Total Views | 34

pm modi 
 
मुंबई : देशातील वातावरण सध्या राममय झाले आहे. सगळेचण आतूरतेने २२ जानेवारीची वाट पाहात आहेत. अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. यात आता दुरदर्शन वाहिनीवरील रामायण मालिकेतील प्रभू श्रीराम यांची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल यांनाही राम मंदिर प्रतिष्ठापणेचे आमंत्रण मिळाले आहे.
 
राम मंदिर प्रतिष्ठापनेचं आमंत्रण मिळाल्यानंतर अरुण गोविल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ANI ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, "राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचं आमंत्रण मिळालं, याचा मला आनंद आहे. या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आणि प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी मी उत्सुक आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. मला वाटतं की आपण याचे श्रेय मोदींना कोणाला द्यायला हवं. त्यांनी ज्याप्रकारे काम केले आहे. त्यामुळे सगळीकडे ऊर्जा निर्माण झाली आहे. ते कौतुकास पात्र आहेत."
 
 
 
पुढे ते म्हणाले की, "याप्रकारचे काम एका व्यक्तीकडून होत नाही, असं देखील मला वाटतं. पण, मोदींमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. सगळ्यांनी कित्येक वर्षांपासून यासाठी काम केलं आहे. अनेकांनी यासाठी बलिदान दिलं आहे. काही जण अजूनही आपलं योगदान देत आहेत."
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121