...म्हणून ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं, पवारांचं निकालावर भाष्य

    10-Jan-2024
Total Views | 116
Sharad Pawar on MLA Disqualification Result

मुंबई :
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी थोड्या वेळापूर्वीच शिवसेना आमदार अपात्रतेबाबत निकाल जाहीर करत शिंदे गटाला अधिकृत राजकीय पक्षाची मान्यता दिली. त्यानंतर उबाठा गटासह त्याच्या मित्रपक्षाकडून यासंदर्भात भाष्य केले जात आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत या सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे.

पवार म्हणाले, निकालासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी याआधीचं भाष्य केले असल्याने उध्दव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात जावं, असा सल्ला पवारांनी माध्यमांशी बोलताना दिला. आजच्या निकालातून शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांचेही आमदार पात्र ठरविण्यात आले आहेत. तसेच, शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून ग्राह्य धरण्यास विधानसभाध्यक्षांनी मान्यता दिली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121