साक्षी हत्याकांड अहवाल; खुनापूर्वी साहिलने केला होता पीडितेचा बलात्कार!

    03-Sep-2023
Total Views | 123
Sakshi murder case update
 
नवी दिल्ली : दिल्लीतील शाहाबाद डेअरी परिसरात तीन महिन्यांपूर्वी एका मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (एफएसएल) अहवालात अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील नवीन तपशील समोर आला आहे. रिपोर्टनुसार, पीडितेच्या हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कारही करण्यात आला होता. दि. ३१ ऑगस्ट रोजी बलात्काराची पुष्टी झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचे कलम वाढवले. २८ मे रोजी २० वर्षीय मोहम्मद साहिल याने १६ वर्षीय पीडितेची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर तिच्या डोक्यात वार करून तिची हत्या केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या हत्येप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात आरोपी मोहम्मद साहिलवर SC/ST कायद्यासह POCSO कायद्याच्या कलमांचा समावेश आहे. दरम्यान, पोस्टमॉर्टमशिवाय एफएसएल अहवालही समोर आला आहे. अहवालात मृताच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वीर्य सापडले होते, त्यामुळे बलात्काराची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आता पोलिसांनी या प्रकरणात बलात्काराचे कलम जोडून फाइल न्यायालयात सादर केली आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मृताच्या शरीरावर ३४ जखमा आढळल्या आहेत. पीडितेची आतडे बाहेर आली होती आणि कवटीचा काही भाग फुटला होता. शरीरातील सुमारे ७० हाडे तुटली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.सुमारे ९० सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये साहिल वारंवार मुलीला एका हाताने भिंतीवर ढकलून तिच्यावर चाकूने हल्ला करताना दिसत आहे. बरेच लोक तेथून जात होते पण त्यापैकी कोणीही मुलीला मदत केली नाही. पीडित मुलगी आणि साहिल हे दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
 
साहिलने रागाच्या भरात नसून पूर्ण नियोजन करून हत्या केल्याचेही या हत्येच्या तपासात उघड झाले आहे. पीडित तरुणी ज्या रस्त्यावरून वारंवार जात होती, त्या रस्त्यावर आरोपी सकाळपासून फिरत होता. पीडितेशिवाय साहिलला तिचा आधीच्या प्रियकराला आणि इतर काही लोकांनाही मारायचे होते.
 
हा कट घडवून आण्यासाठी साहिलने १५ दिवसांपूर्वी बाजारातून चाकू आणला होता. पीडितेची हत्या करण्यापूर्वी साहिलने मद्यपान केले होते. हत्येनंतर साहिल उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील त्याच्या मावशीच्या घरी पळून गेला, तेथून त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121