'जी.एस.बी.'च्या गणरायाचे सरसंघचालकांनी घेतले दर्शन

    20-Sep-2023
Total Views | 41

Sarsanghachalak - GSB Ganpati
(Sarsanghachalak at GSB Ganpati)

मुंबई :
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाल्याची पाहायला मिळत आहे. वातावरणही हर्षमय झाले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. बुधवार, दि. २० सप्टेंबर रोजी सरसंघचालकांनी सायनच्या किंग्स सर्कल येथील 'जी.एस.बी सेवा मंडळ'च्या गणरायाचे दर्शन घेतले. दरम्यान त्यांच्याकडून एक हवनदेखील (गणहोम) यावेळी करण्यात आले. विशेष म्हणजे जी.एस.बी सेवा मंडळातर्फे त्यांची नारळांनी 'तुला' करण्यात आली.

Sarsanghachalak - GSB Ganpati (2)

उपस्थितांना मार्गदर्शन करत सरसंघचालक म्हणाले, की "अयोध्येत तयार होणारे श्रीराम मंदिर हे वास्तविक राष्ट्रमंदिरच्या निर्माण कार्याचा प्रारंभ आहे. ते कार्य निर्विघ्न होवो यासाठी आपण गणरायाचरणी प्रार्थना केली. कार्य पूर्ण कराण्याचा निर्धार आपल्याला करायचा आहे. आपला संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी श्री समर्थ आहेत. परंतु ते कार्य करताना आपले नित्य कर्तव्य कसे पूर्ण होईल याची काळजी प्रत्येकाला घ्यावी लागेल. पवित्र, मंगल, शुभ, लोकहितकारी गोष्टींच्या पाठीशी ईश्वराचा आशीर्वाद कायम असतो. हा विश्वास कायम ठेऊन उचित कार्य होईल याचा विचार करण्याची सर्वांना आवश्यकता आहे. ईश्वराकडे आपण जे आता मागितले त्याचा विनियोग राष्ट्र, धर्म, संस्कृती आणि समाजासाठी आपल्याला करायचा आहे."; असा विश्वास देत त्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121