'मॅजिक ॲाफ ॲक्टींग' - अभिनयाची तीनदिवशीय निशुल्क कार्यशाळा

    30-Aug-2023
Total Views | 37

vaman kendre 
 
मुंबई : 'रंगपीठ थिएटर-मुंबई'ने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंदिर ट्रस्ट- मुंबई'च्या सहकार्याने तीन दिवस चालणार्या कार्यशाळेचे आयोजन 'श्री शिवाजी मंदिर' नाट्यगृह इमारतीतील 'राजर्षी शाहू सभागृह' येथे केले आहे. ही कार्यशाळा ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत असून निशुल्क आहे. तेव्हा इच्छुकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. "अभिनयाची जादू" या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन 'राजर्षी शाहू सभागृह-दादर' येथे दिनांक ८ व ९ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.३० आणि रविवार १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा १६ ते ६० वर्ष या वयोगटातील कलांवत- प्रशिक्षणार्थींसाठी असणार आहे. या कार्यशाळेसाठी सुप्रसिद्ध अभिनय प्रशिक्षक मार्गदर्शक प्रा. वामन केंद्रे प्रशिक्षण देतील.
 
वामन केंद्रे यांचं अभिनय व नाट्य प्रशिक्षण क्षेत्रातील योगदान हे अमूल्य आहे. त्यांच्याकडे शिकलेले आणि नावारूपाला आलेले शेकडों कलावंत आज नाटक, चित्रपट, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, रेडिओ, नाट्य-चित्रपट शिक्षण इत्यादी माध्यमात अग्रेसर आहेत. ते देशात-विदेशात दबदबा निर्माण करून कार्यरत आहेत. प्रा. केंद्रे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, जापान, सिंगापूर , मॉरीशस इत्यादी देशांबरोबरच भारतभर ४०० पेक्षा अधिक कार्यशाळा घेऊन, राष्ट्रीय- आंतरीष्ट्रीय किर्तीचे कलाकार घडवले आहेत.
वामन केंद्रे यांना आत्तापर्यंत 'संगीत नाटक अकादमी-दिल्ली', 'राष्ट्रीय कालीदास सन्मान' (मध्य प्रदेश), 'ब. व. कारंत पुरस्कार', 'मनोहर सिंग स्मृती पुरस्कार' (नॅशनल स्कूल ऑफ ड्रॉमा ), 'राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान' (उज्जैन), 'रमेश सिंग राष्ट्रीय सन्मान'( पटना ) व 'पद्मश्री पुरस्कार' (भारत सरकार) अशा ७ 'राष्ट्रीय पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले आहे.
 
या निःशुल्क कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व अभिनय या क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या कलावंतानी सदर कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी 9820868628 या नंबरवर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे अथवा rangpeeththeatremumbai@gmail.com येथे संपर्क साधावा असे आवाहन 'श्री छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्ट'चे अध्यक्ष ब्रिगे. सुधीर सावंत व 'रंगपीठ थिएटर-मुंबई'च्या संचालिका सौ. गौरी केंद्रे यांनी केले आहे.प्रथम येणा-यास प्रथम या तत्वावर प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121