_202308301222491200_H@@IGHT_350_W@@IDTH_467.jpeg)
मोदी सरकारचे गृहिणींना गिफ्ट गॅस सिलेंडरच्या किंमतीत ' एवढ्याने ' कपात
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी केंद्र सरकारने गॅसचा सबसिडी किंमतीत अधिक २०० रूपयांनी घट केली आहे. एकप्रकारे घरगुती विनिमयासाठी हे एकप्रकारे सर्वसामान्य माणूस आणि गृहिणी यांना दिलासा मिळणार आहे. सबसिडीसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना हा फायदा मिळणार असून यामुळे देशात गॅस किंमती आटोक्यात येणार आहे. नुकतीच ५० रूपयांनी एलपीजी गॅसची किंमत वाढली होती.
या निर्णयाने उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थींना याचा लाभ होईल. मार्च १ ला सिलेंडर किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली होती. या भाववाढीवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून ही किंमत अजून कमी व्हावी असे आव्हान सरकारला केले आहे. दुसरीकडे या निर्णयामुळे एक वर्ग आनंदित झालेला पाहिला मिळाला.
शहरांनुरूप गॅस सिलेंडरचा दर - अनुक्रमे दिल्ली - ९०३, कलकत्ता ९२९, मुंबई ९०२.५० चेन्नई ९१८ इतके आहेत. लाभार्थ्यांना २०० रूपयांची आधीपासून सबसिडी सवलत मिळत असल्याने अधिक २०० रुपयांची सवलत मिळणार आहे. केंद्रीय तेल मंत्री हरदीप सिंग पुरींनी मोदींच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला असल्याचे ' एक्स ' वर ट्विट करून सांगितले.