बोईंगने लष्कराच्या मदतीसाठी उचलले पाऊल
नवी दिल्ली : डिफेन्स क्षेत्रातील अग्रणी नाव बोईंग कंपनीने लष्करी वापराकरिता 'अपाचे' या हेलिकॉप्टरचे उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. उत्कृष्ट 'स्टेट ऑफ आर्ट ' सुविधा असलेले बोईंग विमान हे अमेरिकेतील मेसा एरीझोना मेसा येथे उत्पादीत होणार आहे.
भारतीय लष्कराचे ए एच - ६४ ई हेलिकॉप्टर हे एकदम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवले गेले असून हे खूप कार्यक्षम असल्याचे समजत आहे. लष्करी बचाव व संरक्षण या सुविधेसाठीही या हेलिकॉप्टरची चांगली क्षमता आहे .
कंपनीने टाटा बोईंग एरोस्पेस लिमिटेडशी हातमिळवणी करून एक एच ६४ ई चे उत्पादन सुरू केले. कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात, हे आधुनिक हेलिकॉप्टर लष्कराच्या ऑपरेशन्ससाठी पुरक ठरून लष्करी कामगिरी उंचावेल असे म्हणले गेले आहे.
ही मोठी घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. लष्करी सामर्थ्यात या हेलिकॉप्टरचा सपोर्ट नक्कीच एक नवीन अनुभव देईल.' असे बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलील गुप्ते म्हणाले.
बोईंग कंपनीत सुमारे ५००० कर्मचारी काम करतात. १३००० हून अधिक सप्लाय चेन सहयोगी बोईंग कंपनीचे आहेत.